Consciousness..
Christopher Nolan च्या "The Dark Knight" फिल्म मधला एक सीन. फिल्म शेवटाला आलेली असते. Joker च्या भीतीने जमेल तेवढी जनता मुख्य सिटी च्या थोडं दूर नदी मध्ये वास्तव्याला जाते. दोन नौका असतात. एक नौकेमध्ये गुन्हेगारांना ठेवलेलं असते आणि दुसऱ्या नौकेमध्ये खचाखच भरून सामान्य जनता असते. किनारा सुटतो मध्यावधी मध्ये नौका जातात. सुटकेचा निश्वास टाकून पण भीती त्यांचा पिच्छा सोडत नसते. तितक्यात joker ने मांडलेला अजून एक खेळ त्यांच्या लक्षात येतो. दोन्ही नौकेमध्ये joke r ची आकाशवाणी होते, नौकांमध्ये bomb ठेवला आहे आणि detonator(bomb ची एक key) joker कडे आहे. Joker being Joker. त्याने अजून दोन detonator बनवले असतात. गुन्हेगारांच्या नौकेमधल्या bomb ची key सामान्यांच्या नौकेमध्ये आणि सामान्यांच्या नौके मधल्या bomb ची key गुन्हेगारांच्या नौकेमध्ये!! आता त्याचा खेळ ऐका: मध्यरात्र होण्याच्या आत, एका नौके ने दुसऱ्या नौके ला मात द्यायची आहे अथवा joker दोन्ही नौकांचे फटाके वाजवेल! सगळ्या नौकेधाऱ्यांची पाचावर धारण होते. मृत्यू शय्ये वर बसल्याची जाणीव मोक्कार असते. अश्यावेळी सगळ्यांना आपल्या भ...