Posts

Showing posts with the label विद्रोह

विद्रोहाचे चटके

Image
चित्रपटात गुंडगिरी करणारा हिरो जास्त भोवतो. त्याचं कारण त्याच्या डोळ्यातली आग आणि त्याला सतत पोळत असलेले विद्रोहाचे चटके. मुळशी पॅटर्न च्या आपल्या हिरो (परिस्थिती मुळे गुंड) चा माज काहीसा तसाच दिसतो. तो रानटी आहे, पण दिल त्याच्यात पण धडकतो हे सातत्याने जाणवत.               IT कंपन्यांना आलेलं पेव, त्यात बापानं कवडी मोलाण विकलेली जमीन, आलेले पैसे उडवून मोकळे झालेले कुटुंब, आणि ह्या सगळ्यात उपेक्षित राहून कसा बसा वाढलेला त्यांचा पोरगा. ह्याची काहीच चूक नाही, पण पुढं पकडलेला रस्ता चुकला. बाकी पुढं बरबाद झालेलं सगळं पाहिलं असेलच. मुळात, आधी काय घडलं, त्यात आपला काही हात होता अथवा नाही हे गौण आहे. आज च्या परिस्थितीत तुम्ही कोणता रस्ता निवडता हे जास्ती महत्वाचं असते, नेहमी! जमीन गिळणाऱ्या रान डुकराच्या मर्सिडीजचा लोगो उपटून छाताडावर मिरवणाऱ्या हिरोचा माज विद्रोहाच्या चटक्यांना झाकू शकला नाही.