गॉड पार्टिकल
या पार्टिकल च खर नाव आहे "Higgs Boson". हा भौतिक शास्त्रातला पार्टिकल थियरी मधला एक कण आहे. झाल अस की या पार्टिकल बद्दल शाश्वत अस खूप दिवस पुढ आल नाही, कुतूहल वाढत गेल आणि मग शक्यता तपासता तपासता एका वेगळ्या उंचीवर हा महाशय पोहोचला. मग एका Leon Lederman नावाच्या प्रसिद्ध लेखक आणि फिल्म डाइरेक्टरने या पार्टिकल थियरी वर पुस्तक लिहिल आणि त्यात या पार्टिकल चा उल्लेख "गॉड पार्टिकल" असा केला. त्याला हे पटवून द्यायचे होते की हा पार्टिकल श्रष्टी च्या उत्पत्ती ची ग्वाही देतो. पुढे काही शास्त्रज्ञ मंडळींनी या नावाला आक्षेप घेतला व मतभेद आजही आहेत. या भौतिक शास्त्रातल्या गॉड पार्टिकल च काय खर माहिती नाही पण खरतर हा असला पार्टिकल प्रत्येकाच्या आतमधे दडलेला असतो. जो आपल्या सर्व कृतीना कारणीभूत असतो, आपल्याला सतत पेटता ठेवतो आणि आपल्या जगण्यात त्रान आणतो. तो जाम भारी असतो! मुळात तो आहेच, फक्त त्याची खात्री पटत नाही म्हणून अस्तित्व नाकरतो आपण. त्याला एकदा डोळे झाकून विश्वास टाकायला काय हरकतेय? मग बघा हे शरीराच मशीन कस आतून बाहेरून लखलखीत करतो हा आतला "गॉड पार्टिकल"!
Comments
Post a Comment